Tuesday 19 July 2016

दक्षिण चीन सागरात चीनच्या लष्करी कवायती

दक्षिण चीन सागरावर चीनला हक्क सांगता येणार नाही, असा निकाल आंतरराष्ट्रीय लवादाने दिला असला, तरी चीनने आता तेथे लष्करी कवायती करण्याची घोषणा केली आहे. हा सागरी प्रदेश आमचाच आहे, लष्करी कवायती करताना चीन हा भाग बंद करणार आहे, असे सांगण्यात आले. हैनान सागरी प्रशासनाने सांगितले, की आग्नेयेकडील बेटाचा भाग सोमवार ते गुरुवार असा बंद करण्यात येईल पण नेमक्या कशा प्रकारच्या
लष्करी कवायती होणार आहेत हे सांगण्यात आलेले नाही. नौदल व संरक्षण मंत्रालयाने यावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अमेरिकी नौदलाच्या एका वरिष्ठ अ‍ॅडमिरलने दक्षिण चीन सागराच्या तंटय़ाबाबत या भागात भेट दिली असून त्यांचा तीन दिवसांचा दौरा सुरू असतानाच चीनने ही घोषणा केली आहे. अमेरिकेचे नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल जॉन रिचर्डसन यांनी चीनच्या नौदलाचे कमांडर अ‍ॅडमिरल वू शेंदाली यांची भेट घेतली. त्यांनी क्िंवगाडो या बंदराला भेट दिली. ते नौदलाच्या पाणबुडी अकादमीला भेट देणार आहेत. चीनच्या पहिल्या विमानवाहून युद्धनौकेवरही ते जाणार आहे. रिम ऑफ पॅसिफिक लष्करी युद्धकवायतीवर ते चर्चा करणार आहेत. चीनने मंगळवारी आंतरराष्ट्रीय लवादाने दिलेला निकाल फेटाळला असून दक्षिण चीन सागरी प्रदेशावरचा हक्क सोडण्यास नकार दिला आहे. चीनच्या विरोधात फिलिपिन्सने दावा दाखल केला होता. दक्षिण चीन सागर हा चीनला वारसा हक्काने मिळालेला भाग आहे असे चीनचे म्हणणे असून तेथे हवाई संरक्षण निर्धारण भाग जाहीर करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे. संबंधित वादग्रस्त भागात त्यांनी दोन नागरी विमाने उतरवली असून फिलिपिन्सच्या मच्छीमारी बोटी रोखण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेने चीनच्या आक्रमणाला लष्करी दले वापरून विरोध करावा, असे अमेरिकेचे माजी कमांडर डेनीस ब्लेअर यांनी बुधवारी एका सुनावणीत सांगितले आहे. चीनने आंतरराष्ट्रीय सागरी नियमांचे उल्लंघन करताना प्रवाळ बेटे नष्ट केली असून मच्छीमारी व तेलशोधन करून बरेच नुक सान केले आहे, असे लवादाने म्हटले आहे. 

No comments:

Post a Comment

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

http://www.pratiyogitakiranonline.com/
http://www.kirannews.in/
http://west-bengal-government-jobs.blogspot.in/
http://upscmpsc.blogspot.in/
http://up-government-jobs.blogspot.in/
http://teacherexams.blogspot.in/
http://tamil-nadu-government-jobs.blogspot.in/
http://staffselectioncommission.blogspot.in/
http://spardhaparikshahelp.blogspot.in/
http://sarkari-naukri-kiran.blogspot.in/
http://reasoningexams.blogspot.in/
http://rajasthan-government-jobs.blogspot.in/
http://railwayexams.blogspot.com/
http://punjab-government-jobs.blogspot.in/
http://previous-questionpapers.blogspot.in/
http://pradeepclasses.blogspot.in/
http://policeexams.blogspot.in/
http://mpschelp.blogspot.com/
http://mp-government-jobs.blogspot.com/
http://medical-government-jobs.blogspot.in/
http://maharashtra-government-jobs.blogspot.in/
http://ksbms.blogspot.in/
http://kp-pune.blogspot.in/
http://kp-ahmedabad.blogspot.in/
http://kiranworkfromhome.blogspot.in/
http://kiranprakashan.blogspot.in/
http://kiraninstituteforcareerexcellence.blogspot.com/
http://kirancurrentaffairs.blogspot.in/
http://kirancompetitivecurrentevents.blogspot.in/
http://kicaonline.blogspot.in/
http://karnataka-government-jobs.blogspot.in/
http://iwantgovernmentjob.blogspot.in/
http://it-government-jobs.blogspot.in/
http://gujarat-government-jobs.blogspot.com/
http://government-jobs-kiran.blogspot.in/
http://freecareerhelp.blogspot.com/
http://engineering-government-jobs.blogspot.in/
http://competitivemaths.blogspot.in/
http://competitivegeneralstudies.blogspot.in/
http://competitiveexamhelp.blogspot.in/
http://competitiveenglish.blogspot.in/
http://competitivecurrentaffair.blogspot.in/
http://central-government-jobs.blogspot.in/
http://bihar-government-jobs.blogspot.in/
http://bankexamhelpdesk.blogspot.in/
http://advocate-vakil.blogspot.in/
© Kiran Institute of Career Achievements. (Kiran Prakashan Pvt Ltd.). Powered by Blogger.