Friday 22 July 2016

खासगी बँकाही बुडीत कर्जाच्या समस्येने ग्रस्त


वाढत्या बुडीत कर्जाचा ससेमिरा खासगी क्षेत्रातील बँकांनाही चुकलेल्याचे गुरुवारच्या निवडक तिमाही वित्तीय निष्कर्षांवरून स्पष्ट झाले. या क्षेत्रात अव्वल असलेल्या एचडीएफसी बँकेने नफ्यातील तब्बल २० टक्के वाढ नोंदविली; मात्र बँकेच्या ढोबळ अनुत्पादित मालमत्तेचे प्रमाण १.०४ टक्क्य़ावर गेले आहे, तर याच क्षेत्रातील कोटक महिंद्र बँकेच्या बुडीत कर्ज प्रमाणात २.२० टक्क्य़ांपर्यंत वाढ झाली आहे. बँकेचा नफा मात्र चौपटीने
वाढला आहे. व्याजातून मिळणाऱ्या वाढीव उत्पन्नाच्या जोरावर एचडीएफसी बँकेचा २०१६-१७ च्या एप्रिल ते जून या तिमाहीचा नफा ३,२३९ कोटी रुपयांवर गेला आहे. वार्षिक तुलनेत त्यात थेट २०.२० टक्क्य़ांची वाढ आहे. मात्र त्याचबरोबरीने बँकेचे ढोबळ बुडीत कर्ज वर्षभरापूर्वीच्या ०.९५ टक्क्य़ावरून यंदा १.०४ टक्के झाले आहे, तर एकूण वितरित कर्जाच्या तुलनेत निव्वळ बुडीत कर्ज प्रमाण स्थिर, ०.३ टक्के राहिले आहे. यासाठी बँकेला यंदा थोडय़ा अधिक प्रमाणात, ८६६.७० कोटी रुपये आर्थिक तजवीज करावी लागली आहे. वर्षांपूर्वी ही रक्कम ७२८ कोटी रुपये होती.
बँकेच्या निव्वळ महसुलात तब्बल ७१ टक्के हिस्सा राखणारे बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न २१.८ टक्क्य़ांनी वाढल्याचे बँकेचे उपव्यवस्थापकीय संचालक परेश सुखथनकर यांनी सांगितले. बँक क्षेत्राच्या २३.२ टक्क्य़ांच्या तुलनेत एचडीएफसी बँकेचे कर्जवाढ तिपटीने वाढले असल्याची माहितीही त्यांनी दिली.
आयएनजी वैश्य बँक ताब्यात घेणाऱ्या कोटक महिंद्र बँकेचे ढोबळ अनुत्पादित मालमत्ता प्रमाण २.२० टक्के झाले आहे. वर्षभरापूर्वीच्या पहिल्या तिमाहीत ते २.०४ टक्के होते. तर निव्वळ अनुत्पादित प्रमाणही १.०६ टक्क्य़ावर पोहोचले आहे.

No comments:

Post a Comment

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

http://www.pratiyogitakiranonline.com/
http://www.kirannews.in/
http://west-bengal-government-jobs.blogspot.in/
http://upscmpsc.blogspot.in/
http://up-government-jobs.blogspot.in/
http://teacherexams.blogspot.in/
http://tamil-nadu-government-jobs.blogspot.in/
http://staffselectioncommission.blogspot.in/
http://spardhaparikshahelp.blogspot.in/
http://sarkari-naukri-kiran.blogspot.in/
http://reasoningexams.blogspot.in/
http://rajasthan-government-jobs.blogspot.in/
http://railwayexams.blogspot.com/
http://punjab-government-jobs.blogspot.in/
http://previous-questionpapers.blogspot.in/
http://pradeepclasses.blogspot.in/
http://policeexams.blogspot.in/
http://mpschelp.blogspot.com/
http://mp-government-jobs.blogspot.com/
http://medical-government-jobs.blogspot.in/
http://maharashtra-government-jobs.blogspot.in/
http://ksbms.blogspot.in/
http://kp-pune.blogspot.in/
http://kp-ahmedabad.blogspot.in/
http://kiranworkfromhome.blogspot.in/
http://kiranprakashan.blogspot.in/
http://kiraninstituteforcareerexcellence.blogspot.com/
http://kirancurrentaffairs.blogspot.in/
http://kirancompetitivecurrentevents.blogspot.in/
http://kicaonline.blogspot.in/
http://karnataka-government-jobs.blogspot.in/
http://iwantgovernmentjob.blogspot.in/
http://it-government-jobs.blogspot.in/
http://gujarat-government-jobs.blogspot.com/
http://government-jobs-kiran.blogspot.in/
http://freecareerhelp.blogspot.com/
http://engineering-government-jobs.blogspot.in/
http://competitivemaths.blogspot.in/
http://competitivegeneralstudies.blogspot.in/
http://competitiveexamhelp.blogspot.in/
http://competitiveenglish.blogspot.in/
http://competitivecurrentaffair.blogspot.in/
http://central-government-jobs.blogspot.in/
http://bihar-government-jobs.blogspot.in/
http://bankexamhelpdesk.blogspot.in/
http://advocate-vakil.blogspot.in/
© Kiran Institute of Career Achievements. (Kiran Prakashan Pvt Ltd.). Powered by Blogger.