Wednesday 13 July 2016

अब्बास किरोस्तामी


सिनेमाचा विकास डी डब्लू ग्रिफिथ यांच्यापासून सुरू होतो आणि किरोस्तामी यांच्याभोवती येऊन थांबतो’ असे जाँ लॉक गोदार्द यांनी म्हटले होते! यातले किरोस्तामी म्हणजे, सोमवारी पॅरिसमध्ये निधन झालेले इराणी चित्रपट-दिग्दर्शक अब्बास किरोस्तामी. दारियुश मेहरजुई यांच्या ‘द काऊ’ (१९६९) पासून सुरू झालेल्या इराणियन न्यू वेव्हला महंमद मक्मलबाफ यांच्यासोबत किरोस्तामींनी जागतिक पटलावर नेऊन ठेवले.
कलात्मक आणि व्यावसायिक चित्रपटाची सीमारेषा धूसर करणारी सिनेमाची सरमिसळ संस्कृती १९८०च्या दशकामध्ये जगभरच्या अनेक देशांत रुजू लागली; त्याच वेळी इराणमधील कौकर या खेडय़ात घडणारी चित्रत्रयी निर्माण करून किरोस्तामी यांनी जगाचे लक्ष इराणी चित्रपटांकडे वेधले. ‘व्हेअर इज माय फ्रेण्ड्स होम’, ‘लाइफ अ‍ॅण्ड नथिंग मोअर’, ‘थ्रू द ऑलिव्ह ट्री’ हे ते तीन चित्रपट. भूकंपात १९९० साली उद्ध्वस्त झालेल्या गावात, पहिल्या चित्रपटामध्ये चुकीने आणलेल्या शाळेतील मित्राची गृहपाठाची वही चुकून आपल्या दप्तरात आल्याने ती परत करण्यासाठी शेजारच्या गावातील त्याचे घर शोधणाऱ्या मुलाची आहे. तर इतर दोन्ही चित्रपटांत भूकंपाचे तीव्र पडसाद आहेत. कल्पना आणि वास्तव या दोहोंच्या आधारे डॉक्युफिल्मचा अनुभव देण्याची हातोटी किरोस्तामी यांच्या चित्रपटांत आहे. आत्महत्येनंतर आपला अन्त्यविधी करण्यासाठी शहर पछाडणाऱ्या ‘टेस्ट ऑफ द चेरी’तल्या नायकाची निर्मिती असो किंवा समकालीन दिग्दर्शक मक्मलबाफ यांनाच चित्रपटात सहभागी करून वास्तवाला कथेचा भाग करण्याचा प्रकार असो, किरोस्तामीच्या दरएक चित्रपटांनी त्याच्या दर्शकांना वैचारिक आणि कलात्मक पातळीवर मोठय़ा उंचीचा अनुभव दिला.

तेहरानमध्ये चित्रकला आणि रंगकाम अशा दोन्ही गोष्टी करणाऱ्या घरात जन्मलेले किरोस्तामी यांनी ग्राफिक डिझायनिंगमध्ये उच्च शिक्षण घेतले. १९६०च्या दशकात टीव्ही जाहिरातींमध्ये दबदबा करून त्यांनी जाहिरात क्षेत्रात नाव सिद्ध केले. याच दरम्यान इराणची इस्लामी क्रांती, दमनकारी राजवट यांच्या पाश्र्वभूमीवर त्यांच्यातला सिनेमा आकार घेऊ लागला. कथा/पटकथा-लेखनाचे तसेच चित्रभाषेचे प्रयोग त्यांनी केले. अभिव्यक्तिस्वातंत्र्य दडपणाऱ्या देशातही, लोकांच्या जगण्याचे अचूक भान असेल तर त्याचे प्रतिबिंबच चित्रपटांत उमटतेच, हे त्यांनी सिद्ध केले. सर्वोच्च पारितोषिक मिळवून कान महोत्सव गाजविलेल्या किरोस्तामी यांच्या चित्रपटांनी नंतर आलेल्या जाफर पनाही, माजिद मजिदी, असगर फरादी यांचे चित्रपट देशांच्या सीमा ओलांडून जनप्रिय होण्यामध्ये मोठा वाटा उचलला. जगात सारे काही सरमिसळीतून तयार होते, हे त्यांच्या ताज्या ‘सर्टिफाइड कॉपी’ या इराणबाह्य़ देशात तयार झालेल्या चित्रपटाद्वारे त्यांनी पटवून दिले. जागतिक कलात्मक जगताचे आणि काही अंशी सर्वच मानवी व्यवहारांमध्ये आलेल्या जटिलतेचे इराणच्या पाश्र्वभूमीवर दर्शन घडवून देणाऱ्या किरोस्तामी यांचा चित्रपट या शतकातील चित्रकर्त्यांनाही अवलोकनासाठी महत्त्वाचा ठरतो.

No comments:

Post a Comment

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

http://www.pratiyogitakiranonline.com/
http://www.kirannews.in/
http://west-bengal-government-jobs.blogspot.in/
http://upscmpsc.blogspot.in/
http://up-government-jobs.blogspot.in/
http://teacherexams.blogspot.in/
http://tamil-nadu-government-jobs.blogspot.in/
http://staffselectioncommission.blogspot.in/
http://spardhaparikshahelp.blogspot.in/
http://sarkari-naukri-kiran.blogspot.in/
http://reasoningexams.blogspot.in/
http://rajasthan-government-jobs.blogspot.in/
http://railwayexams.blogspot.com/
http://punjab-government-jobs.blogspot.in/
http://previous-questionpapers.blogspot.in/
http://pradeepclasses.blogspot.in/
http://policeexams.blogspot.in/
http://mpschelp.blogspot.com/
http://mp-government-jobs.blogspot.com/
http://medical-government-jobs.blogspot.in/
http://maharashtra-government-jobs.blogspot.in/
http://ksbms.blogspot.in/
http://kp-pune.blogspot.in/
http://kp-ahmedabad.blogspot.in/
http://kiranworkfromhome.blogspot.in/
http://kiranprakashan.blogspot.in/
http://kiraninstituteforcareerexcellence.blogspot.com/
http://kirancurrentaffairs.blogspot.in/
http://kirancompetitivecurrentevents.blogspot.in/
http://kicaonline.blogspot.in/
http://karnataka-government-jobs.blogspot.in/
http://iwantgovernmentjob.blogspot.in/
http://it-government-jobs.blogspot.in/
http://gujarat-government-jobs.blogspot.com/
http://government-jobs-kiran.blogspot.in/
http://freecareerhelp.blogspot.com/
http://engineering-government-jobs.blogspot.in/
http://competitivemaths.blogspot.in/
http://competitivegeneralstudies.blogspot.in/
http://competitiveexamhelp.blogspot.in/
http://competitiveenglish.blogspot.in/
http://competitivecurrentaffair.blogspot.in/
http://central-government-jobs.blogspot.in/
http://bihar-government-jobs.blogspot.in/
http://bankexamhelpdesk.blogspot.in/
http://advocate-vakil.blogspot.in/
© Kiran Institute of Career Achievements. (Kiran Prakashan Pvt Ltd.). Powered by Blogger.