Wednesday 13 July 2016

पोर्तुगाल, रोनाल्डोचे पहिले आंतरराष्ट्रीय जेतेपद


    एडरच्या निर्णायक गोलने फ्रान्सचा पराभव .बदली खेळाडू एडरने अतिरिक्त वेळेत केलेल्या गोलच्या जोरावर पोर्तुगाल संघाने युरो चषक फुटबॉल स्पध्रेच्या अंतिम सामन्यात यजमान फ्रान्सवर १-० असा विजय साजरा केला. एडरच्या या गोलने पोर्तुगाल आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिले जेतेपद पटकावण्याची स्वप्नपूर्ती केली. २००४च्या युरो स्पध्रेत अंतिम लढतीत ग्रीसकडून पराभव पत्करल्यानंतर
पोर्तुगालला आंतरराष्ट्रीय स्पध्रेवर छाप पाडता आलेली नव्हती. त्या वेळी १९ वर्षांचा सडपातळ बांध्याचा रोनाल्डो ढसाढसा रडला होता. त्याच वेळी राष्ट्रीय संघाला जेतेपद पटकावून देण्याचे पाहिलेले स्वप्न १२ वर्षांनंतर अस्तित्वात उतरले. पहिल्या सत्रात दुखापतीमुळे स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर रडत जाणाऱ्या रोनाल्डोच्या डोळ्यांत जेतेपदानंतर एक वेगळीच चमक दिसत होती.

स्टेड डी फ्रान्स स्टेडियमवरील या सामन्यात यजमान फ्रान्सचे पारडे जड होते. इतिहासही त्यांच्या बाजूने होता आणि त्यामुळेच त्यांच्या पाठीराख्यांच्या चेहऱ्यावर विजयाचा तेज प्रकर्षांने जाणवत होता. पण कामगिरीत सातत्याचा अभाव असूनही अंतिम फेरीत मजल मारणाऱ्या पोर्तुगालच्या चाहत्यांना रोनाल्डोच्या करिष्म्यावर विश्वास होता. २५व्या मिनिटाला मात्र त्यांना धक्का बसला. चेंडू हिसकावण्याच्या नादात फ्रान्सचा दिमित्री पायेटचा पाय दोन वेळा रोनाल्डोच्या डाव्या पायावर आदळला. १६व्या मिनिटाला घडलेल्या पहिल्या प्रकारानंतर रोनाल्डो प्राथमिक उपचार घेत पुन्हा मैदानात परतला, परंतु अस वेदनांमुळे त्याला रडू आवरेनासे झाले. आपल्याला पुढे खेळ कायम करता येणार नाही.. संघाला जेतेपद मिळवून देण्याचे स्वप्न पुन्हा अपूर्ण राहील, ही खंत त्याला सतावत होती आणि पाणावलेल्या डोळ्यांतून ती जाणवत होती. या दिग्गज खेळाडूला धीर देण्यासाठी पोर्तुगालसह फ्रान्सच्या चाहत्यांनीही टाळ्यांचा कडकडाट केला.

रोनाल्डो मैदानाबाहेर गेल्यानंतर फ्रान्सला विजयाची संधी होती, परंतु पोर्तुगालच्या इतर खेळाडूंनी यजमानांना रोखले. पहिल्या सत्रात त्यांचे गोल करण्याचे पाच प्रयत्न पोर्तुगालचा गोलरक्षक रुई पॅट्रिसीओने रोखले. त्यामुळे पोर्तुगालच्या इतर खेळाडूंना लढण्याची ऊर्जा मिळाली. निर्धारित ९० मिनिटांच्या खेळात बचावात्मक खेळ करून पोर्तुगालने सामना गोलशून्य राखण्यात यश मिळवले.

दोन मिनिटांच्या भरपाई वेळेत फ्रान्सच्या अँड्रे-पिएर गिगनॅसने टोलावलेला चेंडू पॅट्रिसीओला चकवून गोलजाळीच्या दिशेने गेला. पोर्तुगालच्या चाहत्यांचा क्षणात काळजाचा ठोका चुकला, परंतु तो गोलखांबाला लागून मागे फिरल्याबरोबर त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

मग अतिरिक्त ३० मिनिटांच्या खेळातील पहिल्या सत्रात पोर्तुगालने संधी गमावल्या. पण दुसऱ्या सत्रात एडरने त्याची भरपाई केली. जोआ मॉटीन्होने डावीकडून टोलावलेला चेंडू एडरने फ्रान्सचा गोलरक्षक ह्युगो लोरीसला चकवून अप्रतिम गोल साकारत पोर्तुगालच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. याचप्रमाणे बचावपटू पेपेने फ्रान्सचे आक्रमण अचूकपणे थोपवले.

    चेहऱ्यावर लाल, हिरव्या आणि पिवळ्या रंगांची रंगरंगोटी करून सेंट्रल लिस्बन येथे पोर्तुगालच्या चाहत्यांनी विजयी जल्लोष साजरा केला. पोर्तुगालचा राष्ट्रीय ध्वज उंचावत जवळपास दहा हजारांहून अधिक चाहत्यांनी राष्ट्रीय संघाच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय जेतेपदाच्या जल्लोषात सहभाग घेतला होता. ‘चॅम्पियन्स.. युरोपातील आम्ही विजेते आहोत,’ असा नारा देत समर्थकांनी आनंद साजरा केला.
    ‘‘शब्दच सुचत नाहीत. या विजयाचे आम्ही हक्कदार आहोत. अखेर आम्ही फ्रान्स चाहत्यांची आणि आम्हाला कमी लेखणाऱ्या प्रत्येकाची तोंडे बंद केली. आम्ही लढवय्ये आहोत, हे सिद्ध झाले आहे,’’ अशी प्रतिक्रिया पोर्तुगाल संघाचा २२ वर्षीय चाहता रुबने सॅर्डिन्हा याने दिली. त्याच्याच शेजारी असलेल्या कार्ला मार्टिन्सच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. संघाने दुसऱ्यांदा जेतेपद पटकावल्यास आश्चर्य वाटणार नाही, असे ती म्हणाली.
    रोनाल्डो स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेताना सर्वाचा काळजाचा ठोका चुकला होता. मात्र एडरच्या गोलने त्यांना जल्लोशाची संधी दिली. ‘‘या विजयाचे आम्ही दावेदार आहोत. रोनाल्डो असता तर कदाचित आणखी एका गोलफरकाने आम्ही जिंकलो असतो, परंतु एक संघ म्हणून आम्ही खेळलो आणि त्याचे फळ मिळाले,’’ असे पोर्तुगालचा चाहता फर्नाडो सिल्व्हा सांगतात.

मला अशा प्रकारचा अंतिम सामना अपेक्षित नसला तरी मी खूप आनंदी आहे. हा चषक सर्व पोर्तुगालवासीयांचा आहे, आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचा आहे. मला या कामगिरीचा अभिमान वाटतो.

– ख्रिस्तियानो रोनाल्डो

विजयी गोल तुलाच करायचा आहे, असे रोनाल्डोने मला सांगितले होते. त्याच्या या वाक्याने मला बळ आणि सकारात्मक ऊर्जा मिळाली.

– एडर

रोनाल्डो आमचा अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे. तो कोणत्याही क्षणाला गोल करू शकतो आणि सर्व प्रश्न एकटय़ाने सोडवू शकतो, परंतु आम्ही एक संघ म्हणून जिंकलो.

No comments:

Post a Comment

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

http://www.pratiyogitakiranonline.com/
http://www.kirannews.in/
http://west-bengal-government-jobs.blogspot.in/
http://upscmpsc.blogspot.in/
http://up-government-jobs.blogspot.in/
http://teacherexams.blogspot.in/
http://tamil-nadu-government-jobs.blogspot.in/
http://staffselectioncommission.blogspot.in/
http://spardhaparikshahelp.blogspot.in/
http://sarkari-naukri-kiran.blogspot.in/
http://reasoningexams.blogspot.in/
http://rajasthan-government-jobs.blogspot.in/
http://railwayexams.blogspot.com/
http://punjab-government-jobs.blogspot.in/
http://previous-questionpapers.blogspot.in/
http://pradeepclasses.blogspot.in/
http://policeexams.blogspot.in/
http://mpschelp.blogspot.com/
http://mp-government-jobs.blogspot.com/
http://medical-government-jobs.blogspot.in/
http://maharashtra-government-jobs.blogspot.in/
http://ksbms.blogspot.in/
http://kp-pune.blogspot.in/
http://kp-ahmedabad.blogspot.in/
http://kiranworkfromhome.blogspot.in/
http://kiranprakashan.blogspot.in/
http://kiraninstituteforcareerexcellence.blogspot.com/
http://kirancurrentaffairs.blogspot.in/
http://kirancompetitivecurrentevents.blogspot.in/
http://kicaonline.blogspot.in/
http://karnataka-government-jobs.blogspot.in/
http://iwantgovernmentjob.blogspot.in/
http://it-government-jobs.blogspot.in/
http://gujarat-government-jobs.blogspot.com/
http://government-jobs-kiran.blogspot.in/
http://freecareerhelp.blogspot.com/
http://engineering-government-jobs.blogspot.in/
http://competitivemaths.blogspot.in/
http://competitivegeneralstudies.blogspot.in/
http://competitiveexamhelp.blogspot.in/
http://competitiveenglish.blogspot.in/
http://competitivecurrentaffair.blogspot.in/
http://central-government-jobs.blogspot.in/
http://bihar-government-jobs.blogspot.in/
http://bankexamhelpdesk.blogspot.in/
http://advocate-vakil.blogspot.in/
© Kiran Institute of Career Achievements. (Kiran Prakashan Pvt Ltd.). Powered by Blogger.