Friday 22 July 2016

गॅरी मार्शल


बरेच हॉलीवूडपट दिग्दर्शकांच्याच नावाने लक्षात राहतात. हे दिग्दर्शक  आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवतीचे वलय इतके मोठे असते की, त्यांच्या चित्रपटात काम करणारे कलाकार कितीही थोर असले, तरी त्या अभिनेत्या-अभिनेत्रींचे सेलिब्रेटीपद त्यापुढे अंमळ कमी ठरते.  नुकतेच निधन झालेले लेखक, दिग्दर्शक, अभिनेते गॅरी मार्शल चित्रकर्त्यांच्या या पंथापासून फटकून राहिले असले, तरी त्यांनी १९९०च्या दशकातील
हॉलीवूड सेलिब्रेटी ‘शाळा’च उघडली होती, असे त्यांच्या कार्यकर्तृत्वावरून दिसते. आधीचे चित्रपट तिकीटबारीवर पार रसातळाला जात असताना ‘प्रेटी वुमन’ हा तरल रोमॅण्टिक सिनेमा बनवून ज्युलिआ रॉबर्ट्स, रिचर्ड गेर यांना त्यांनी आंतरराष्ट्रीय वलय दिले. ‘फ्लेमिंगो किड’मधून मॅट डेमन या अभिनेत्याला, ‘प्रिन्सेस डायरीज’मधून अ‍ॅन हॅथवे या अभिनेत्रीला, तर ‘मॉर्क अ‍ॅण्ड मिण्डी’ या आपल्या टीव्ही मालिकेतून कलंदर अवलिया रॉबिन विल्यम्स यांना जगापुढे आणले. अव्वल कलाकारांना घडविणारा दिग्दर्शक म्हणून गॅरी मार्शल यांची हॉलीवूडमध्ये ख्याती कायम राहिली. १९३४ साली अमेरिकेतील ब्राँक्स शहरामध्ये इटालियन स्थलांतरितांच्या घरात जन्मलेल्या मार्शल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले होते. एका मुलाखतीमध्ये त्यांनी म्हटले होते की, ‘ब्राँक्स’ शहरामध्ये जन्मलेल्या कोणत्याही व्यक्तीपुढे जगण्याचे तीनच पर्याय असतात. पहिला निपुण खेळाडू बनण्याचा, दुसरा गँगस्टर बनण्याचा आणि हे काही न बनल्याबद्दल आयुष्यावर विनोद करण्याचा. ब्राँक्स शहरात निपजलेला विनोदी बाणा घेऊनच त्यांनी वृत्तपत्रातील नोकरी सोडून टीव्ही मालिकांमध्ये विनोद, किस्से, उपहासात्मक नाटुकले लिहिण्यास सुरुवात केली. साठोत्तरी काळात संपन्न आणि उत्तरआधुनिकतेच्या लाटेवर असलेल्या अमेरिकेमध्ये ‘लेट नाइट शोज’चे पीक आले होते. त्या सिच्युएशनल कॉमेडी मालिकांमध्ये महत्त्वाच्या लेखकांत मार्शल यांची वर्णी लागली. त्यांनी केलेल्या चित्रपटांतील कार्यापेक्षा त्यांचे टीव्हीवरील काम लोकप्रिय झाले. ‘हॅपी डेज’, आपल्याकडच्या आमिर खानच्या ‘पीके’ चित्रपटासारखीच, परग्रहावरून मानवयुगात अवतरलेल्या नायकाने उडवून दिलेली सामाजिक भंबेरी दाखविणारी ‘मॉर्क अ‍ॅण्ड मिण्डी’ ही टीव्ही मालिका त्यांनी १९८०च्या दशकात लोकप्रिय केली.  अल पचिनोचा ‘फ्रँकी अ‍ॅण्ड जॉनी’, केट हडसनचा ‘रेसिंग हेलन’ या न गाजलेल्या चित्रपटांत त्यांचा रांगडा विनोद प्रकर्षांने जाणवतो. दोन-तीन दशकांपूर्वीची हॉलीवूडमधील स्टुडिओ संस्कृतीची छोटय़ा पडद्यावर काम करणे हीन असल्याची टीका थोपवून लावत त्यांनी छोटय़ा पडद्यावरील कामाचे समर्थन केले होते . ‘रनअवे ब्राइड’, ‘जॉर्जीआ’ज रुल’ आणि ‘मदर्स डे’ या चित्रपटापर्यंत त्यांच्या लेखन, दिग्दर्शनाच्या खुणा उमटल्या आहेत. स्टीव्हन स्पीलबर्ग, जेम्स कॅमेरॉन, मार्टिन स्कॉर्सेसी, ख्रिस्तोफर नोलान या दिग्गजांइतके बहुज्ञात नसले, तरी कामाने त्यांना त्यांच्याच पंक्तीत बसविणे योग्य ठरेल.

No comments:

Post a Comment

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

http://www.pratiyogitakiranonline.com/
http://www.kirannews.in/
http://west-bengal-government-jobs.blogspot.in/
http://upscmpsc.blogspot.in/
http://up-government-jobs.blogspot.in/
http://teacherexams.blogspot.in/
http://tamil-nadu-government-jobs.blogspot.in/
http://staffselectioncommission.blogspot.in/
http://spardhaparikshahelp.blogspot.in/
http://sarkari-naukri-kiran.blogspot.in/
http://reasoningexams.blogspot.in/
http://rajasthan-government-jobs.blogspot.in/
http://railwayexams.blogspot.com/
http://punjab-government-jobs.blogspot.in/
http://previous-questionpapers.blogspot.in/
http://pradeepclasses.blogspot.in/
http://policeexams.blogspot.in/
http://mpschelp.blogspot.com/
http://mp-government-jobs.blogspot.com/
http://medical-government-jobs.blogspot.in/
http://maharashtra-government-jobs.blogspot.in/
http://ksbms.blogspot.in/
http://kp-pune.blogspot.in/
http://kp-ahmedabad.blogspot.in/
http://kiranworkfromhome.blogspot.in/
http://kiranprakashan.blogspot.in/
http://kiraninstituteforcareerexcellence.blogspot.com/
http://kirancurrentaffairs.blogspot.in/
http://kirancompetitivecurrentevents.blogspot.in/
http://kicaonline.blogspot.in/
http://karnataka-government-jobs.blogspot.in/
http://iwantgovernmentjob.blogspot.in/
http://it-government-jobs.blogspot.in/
http://gujarat-government-jobs.blogspot.com/
http://government-jobs-kiran.blogspot.in/
http://freecareerhelp.blogspot.com/
http://engineering-government-jobs.blogspot.in/
http://competitivemaths.blogspot.in/
http://competitivegeneralstudies.blogspot.in/
http://competitiveexamhelp.blogspot.in/
http://competitiveenglish.blogspot.in/
http://competitivecurrentaffair.blogspot.in/
http://central-government-jobs.blogspot.in/
http://bihar-government-jobs.blogspot.in/
http://bankexamhelpdesk.blogspot.in/
http://advocate-vakil.blogspot.in/
© Kiran Institute of Career Achievements. (Kiran Prakashan Pvt Ltd.). Powered by Blogger.