Tuesday 19 July 2016

ऑलिम्पिकमध्ये रशियावर बंदी घालण्याची ‘वाडा’ची मागणी

सरकार पुरस्कृत उत्तेजक सेवन प्रकरणाचे बिंग उघडकीस सोची, रशिया येथे २०१४मध्ये झालेल्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेत सरकार पुरस्कृत मोठय़ा प्रमाणावर झालेले उत्तेजक सेवन प्रकरण उघडकीस आल्याने जागतिक उत्तेजक विरोधी संघटनेने (वाडा) रिओ ऑलिम्पिक स्पर्धा तसेच अन्य आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये रशियाच्या खेळाडूंवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. कॅनडातील विधीतज्ज्ञ रिचर्ड मॅकलरेन
यांनी ‘वाडा’तर्फे केलेल्या सखोल चौकशीनंतर रशिया सरकार पुरस्कृत उत्तेजक सेवन प्रकरण तीसहून अधिक खेळांना ग्रासले आहे. रशियाच्या माजी राष्ट्रीय उत्तेजक विरोधी प्रयोगशाळा प्रमुखांच्या आरोपांवरून ही चौकशी करण्यात आली. हे यशस्वी होण्यासाठी अत्यंत सुनियोजित पद्धतीने उत्तेजक सेवन प्रकरण २०११च्या उत्तरार्धापासून ऑगस्ट २०१५पर्यंत राबवण्यात आले. खेळाडूंनी पुरवलेल्या मूत्र नमुन्यांमध्ये रशियाच्या क्रीडा मंत्रालयाने जाणीवपूर्वक फेरफार केल्याचेही ‘वाडा’च्या स्वतंत्र चौकशी पथकाने स्पष्ट केले आहे. ‘डिसअ‍ॅपिअरिंग पॉझिटिव्ह मेथडॉलॉजी’ प्रणाली अंतर्गत उत्तेजक सेवनप्रकरणी दोषी आढळलेल्या खेळांडूचे नमुने गहाळ केले जात. या प्रणालीचा फायदा रशियाच्या खेळाडूंना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दोषी आढळलेल्या खेळाडूंचे नमुने बदलून त्याठिकाणी दोषविरहित नमुने ठेवण्यात येत असत. मॅकलरेन यांनी २०१४च्या सोची हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान रशियाच्या खेळाडूंचे नमुने लंडनमधील उत्तेजकविरोधी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. नमुने असणाऱ्या बाटल्यांचे सील शिताफीने तोडून बदल करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सोची ऑलिम्पिक स्पर्धा अतिशय प्रतिष्ठेची केली होती. या स्पर्धेसाठी तब्बल ५० अब्ज डॉलर्स रक्कम खर्च करण्यात आली होती. दरम्यान, रशियाने आतापर्यंत उत्तेजक सेवन प्रकरणाचा इन्कार केला आहे, मात्र आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स संघटना महासंघाने रशियाच्या अ‍ॅथलेटिक्सपटूंवर बंदी घातली आहे. ‘‘वाडाच्या पथकाचा अहवाल अत्यंत धक्कादायक आणि खेळभावनेला बट्टा लावणारा आहे. ऑलिम्पिक आचारसंहितेची पायमल्ली करणाऱ्या गोष्टी समोर आल्या आहेत. उत्तेजक सेवनप्रकरणी दोषी आढळणाऱ्या रशियाच्या खेळाडूंवर कठोर कारवाई करण्यात येईल,’’ असे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बॅच यांनी सांगितले. दरम्यान, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती रशियाच्या खेळाडूंसंदर्भात कारवाईचा निर्णय मंगळवारी घेणार आहे. ‘वाडा’ पथकाच्या अहवालामुळे ऑलिम्पिक स्पर्धेत रशियाच्या खेळाडूंच्या सहभागाबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

No comments:

Post a Comment

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

http://www.pratiyogitakiranonline.com/
http://www.kirannews.in/
http://west-bengal-government-jobs.blogspot.in/
http://upscmpsc.blogspot.in/
http://up-government-jobs.blogspot.in/
http://teacherexams.blogspot.in/
http://tamil-nadu-government-jobs.blogspot.in/
http://staffselectioncommission.blogspot.in/
http://spardhaparikshahelp.blogspot.in/
http://sarkari-naukri-kiran.blogspot.in/
http://reasoningexams.blogspot.in/
http://rajasthan-government-jobs.blogspot.in/
http://railwayexams.blogspot.com/
http://punjab-government-jobs.blogspot.in/
http://previous-questionpapers.blogspot.in/
http://pradeepclasses.blogspot.in/
http://policeexams.blogspot.in/
http://mpschelp.blogspot.com/
http://mp-government-jobs.blogspot.com/
http://medical-government-jobs.blogspot.in/
http://maharashtra-government-jobs.blogspot.in/
http://ksbms.blogspot.in/
http://kp-pune.blogspot.in/
http://kp-ahmedabad.blogspot.in/
http://kiranworkfromhome.blogspot.in/
http://kiranprakashan.blogspot.in/
http://kiraninstituteforcareerexcellence.blogspot.com/
http://kirancurrentaffairs.blogspot.in/
http://kirancompetitivecurrentevents.blogspot.in/
http://kicaonline.blogspot.in/
http://karnataka-government-jobs.blogspot.in/
http://iwantgovernmentjob.blogspot.in/
http://it-government-jobs.blogspot.in/
http://gujarat-government-jobs.blogspot.com/
http://government-jobs-kiran.blogspot.in/
http://freecareerhelp.blogspot.com/
http://engineering-government-jobs.blogspot.in/
http://competitivemaths.blogspot.in/
http://competitivegeneralstudies.blogspot.in/
http://competitiveexamhelp.blogspot.in/
http://competitiveenglish.blogspot.in/
http://competitivecurrentaffair.blogspot.in/
http://central-government-jobs.blogspot.in/
http://bihar-government-jobs.blogspot.in/
http://bankexamhelpdesk.blogspot.in/
http://advocate-vakil.blogspot.in/
© Kiran Institute of Career Achievements. (Kiran Prakashan Pvt Ltd.). Powered by Blogger.