Wednesday 13 July 2016

प्रत्यक्ष कर संकलनात २५ टक्के वाढ



अग्रिम कर भरणा टप्पा विस्तारल्याचा लाभ देशातील प्रत्यक्ष कर संकलनात वाढ होण्यासाठी झाला आहे. एप्रिल ते जून या २०१६-१७ आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत प्रत्यक्ष कर संकलन २४.७९ टक्क्य़ांनी वाढून १.२४ लाख कोटी रुपये झाले आहे. संपूर्ण आर्थिक वर्षांसाठी राखलेले अर्थसंकल्पीय उद्दिष्ट पहिल्या तीन महिन्यांत १४.६३ टक्क्य़ांनी पूर्ण झाले आहे. पहिल्या तिमाहीत वैयक्तिक प्राप्तिकर संकलन २९.८ टक्क्य़ांनी, तर कंपनी कर
संकलन १३.५ टक्क्य़ांनी वाढले आहे. परताव्यानंतरचे प्रत्यक्ष कर संकलन ४८.७५ टक्के, तर कंपनी कर ४.४३ टक्के नोंदले गेले आहे. एप्रिल ते जून २०१६ मध्ये वैयक्तिक प्राप्तिकरात परताव्याचे प्रमाण वार्षिक तुलनेत वाढले आहे.

गेल्या वर्षांच्या अर्थसकंल्पात अग्रिम कर भरणा टप्पे चार करण्यात आले होते. यानुसार १५ टक्के अग्रिम कर भरणा जून, ३० टक्के सप्टेंबर, ३० टक्के डिसेंबर व २५ टक्के मार्चमध्ये निश्चित करण्यात आले आहे. यापूर्वी ते सप्टेंबर, डिसेंबर व मार्च अशा तीन महिन्यांसाठी होते.

*****************************************

देशी वस्त्रोद्योग बाजारपेठ ८ टक्क्य़ाने विस्तारणार

मुंबई : देशांतर्गत वस्त्रोद्योग बाजारपेठ चालू आर्थिक वर्षांत ७ ते ८ टक्के विस्ताराने वाढण्याबाबत आशावाद व्यक्त करण्यात आला आहे. वस्त्रोद्योग निर्यात ४० अब्ज डॉलर होण्याची शक्यताही उद्योगाने वर्तविली आहे.

‘कॉन्फडरेशन ऑफ इंडियन टेक्स्टाइल इंडस्ट्री’ (सीआयटीआय)चे अध्यक्ष नैशाध पारिख यांनी म्हटले आहे की, यंदा अधिक मान्सून अपेक्षित आहे. किंबहुना त्याची सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या प्रोत्साहनपूरक उपाययोजनांचाही या क्षेत्राला लाभ होईल.

***************************************

‘ब्रेग्झिट’ ब्रिटनसाठीच नकारात्मक – मूडीज

पीटीआय, ब्रिटन

युरोपीय संघातून बाहेर पडण्याचा ब्रिटनचा निर्णय देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम करणारा ठरू शकेल, अशी भीती मूडीज या आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थेने व्यक्त केली आहे. ब्रिटनचा विकास दर खुंटवितानाच युरोपीय संघातील काही देशांची अर्थव्यवस्थाही आगामी कालावधीत संथ असेल, असेही मूडीजने म्हटले आहे.

युरोपीय संघ सोडण्याबाबत ब्रिटनने घेतलेल्या मतदानानंतर ब्रिटनची अर्थव्यवस्था २०१६ मध्ये १.५ टक्के, तर २०१७ मध्ये १.२ टक्के दराने वाढेल, असे मूडीजने म्हटले आहे. संस्थेने यापूर्वीचा अंदाज २०१६ व २०१७ करिता अनुक्रमे १.८ व २.१ टक्के व्यक्त केला होता. ‘ब्रेग्झिट’मुळे या देशावर अनिश्चितता निर्माण होणार असून देशातील गुंतवणूकही आटण्याची शक्यता वर्तविली गेली आहे. स्टर्लिग हे चलन अधिक कमकुवत होण्याचा अंदाज व्यक्त करतानाच यामुळे देशाच्या निर्यातीवरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

http://www.pratiyogitakiranonline.com/
http://www.kirannews.in/
http://west-bengal-government-jobs.blogspot.in/
http://upscmpsc.blogspot.in/
http://up-government-jobs.blogspot.in/
http://teacherexams.blogspot.in/
http://tamil-nadu-government-jobs.blogspot.in/
http://staffselectioncommission.blogspot.in/
http://spardhaparikshahelp.blogspot.in/
http://sarkari-naukri-kiran.blogspot.in/
http://reasoningexams.blogspot.in/
http://rajasthan-government-jobs.blogspot.in/
http://railwayexams.blogspot.com/
http://punjab-government-jobs.blogspot.in/
http://previous-questionpapers.blogspot.in/
http://pradeepclasses.blogspot.in/
http://policeexams.blogspot.in/
http://mpschelp.blogspot.com/
http://mp-government-jobs.blogspot.com/
http://medical-government-jobs.blogspot.in/
http://maharashtra-government-jobs.blogspot.in/
http://ksbms.blogspot.in/
http://kp-pune.blogspot.in/
http://kp-ahmedabad.blogspot.in/
http://kiranworkfromhome.blogspot.in/
http://kiranprakashan.blogspot.in/
http://kiraninstituteforcareerexcellence.blogspot.com/
http://kirancurrentaffairs.blogspot.in/
http://kirancompetitivecurrentevents.blogspot.in/
http://kicaonline.blogspot.in/
http://karnataka-government-jobs.blogspot.in/
http://iwantgovernmentjob.blogspot.in/
http://it-government-jobs.blogspot.in/
http://gujarat-government-jobs.blogspot.com/
http://government-jobs-kiran.blogspot.in/
http://freecareerhelp.blogspot.com/
http://engineering-government-jobs.blogspot.in/
http://competitivemaths.blogspot.in/
http://competitivegeneralstudies.blogspot.in/
http://competitiveexamhelp.blogspot.in/
http://competitiveenglish.blogspot.in/
http://competitivecurrentaffair.blogspot.in/
http://central-government-jobs.blogspot.in/
http://bihar-government-jobs.blogspot.in/
http://bankexamhelpdesk.blogspot.in/
http://advocate-vakil.blogspot.in/
© Kiran Institute of Career Achievements. (Kiran Prakashan Pvt Ltd.). Powered by Blogger.